औसा जमीयत - ए - उलेमा तर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप
औसा:(प्रतिनिधी/सय्यद नदीम) जमीयत - ए - उलेमा ही देशाच्या स्वातंत्र्यापासून भारतात आजतागायत सामाजिक क्षेत्रात तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासह राजनैतिक क्षेत्रात संधी देण्याचे काम करते. सध्या कोरोना व्हायरस विषाणूंचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लाॅकडाऊन असल्याने गरजूं, वंचित आणि मुस्लिम धर्मीयांची पवित्र रमजान महिना सुरू असल्याने जमीयत - ए - उलेमा चे औसा तालुका अध्यक्ष मौलाना अमजद सिद्दीकी यांच्या प्रयत्नातून हिंदू - मुस्लिम समाजातील गरजूं बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण करण्यात आल्या. शहरासह ग्रामीण भागात सुमारे ५०० कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू देताना सद्या कोरोना विषाणूंचा संसर्ग असल्याने सोशल डिस्टन्स व आरोग्य सेतू अँपच्या नियमाचे पालन करून करण्यात आले. यावेळी औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल बहुरे, माजी नगरसेवक इब्राहिम पैलवान, मौलाना अमजद सिद्दीकी, एमआयएम चे अफसर शेख, हाफिज मौलाना मुसा कासमी, हाफिज मौलाना फैज अहमद सिद्दीकी, अरशद सिद्दीकी, आवेज सिद्दीकी व बासिद शेख यांच्यासह जमीयत - ए - उलेमाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments