चाकूर तालुक्यातील चिमुकल्या बहिण भावांनी पूर्ण केले १० रोजे
चापोली:(प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्यात चापोली ता.चाकूर येथील आलिया अलिम शेख वय वर्ष ६ व सरफराज अलिम शेख वय वर्ष ८ या सख्खे भाऊ-बहीण यांनी १० रोजे अन्नपाणी त्याग करून परमेश्वरावर श्रद्धा ठेवून पूर्ण केले.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न व पाणी एक कण पण न घेता उपाशी पोटी राहून यांने अल्लाह ईश्वर प्रती श्रद्धा व्यक्त केली.देशात कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाहला या मुलाने साकडे घातले. एवढ्या कमी वयात १० रोजे पूर्ण केल्याबद्दल या भावंडांचे सर्वत्र कौतुक-अभिनंदन होत आहे.
0 Comments