निटूर येथे जलशुद्धीकरण (RO फिल्टर) केंद्राचा शुभारंभ
निटूर:(प्रतिनिधी) ग्रामपंचायत कार्यालय,निटूर एक पाऊल आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ आणि शुद्ध जल सर्व ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायत चे पहिले जलशुद्धीकरण (RO फिल्टर) केंद्राचे रघुउत्तम नगर खालील बाजू ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत जवळ येथे आज ह.भ.प.श्री विरनाथ महाराज लड्डा यांचे हस्ते केंद्राचे श्रीफळ फोडून उदघाटन करण्यात आले यापुढे ५ रु मध्ये २० लिटर शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे. गावात लवकरच आणखी ३ केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सरपंच परमेश्वर हासबे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले यावेळी उपसरपंच संगमेश्वर करंजे,ग्रामपंचायत सदस्य राजकुमार चव्हाण,बशीद गस्ते,लालासाहेब देशमुख,ग्रामपंचायत कर्मचारी नारायण उपळे, सोमनाथ भालके,युवराज नागभूजगे, राजाभाऊ सोनी,राम साळुंके विलास सावळे, गोविंद जमादार,सिध्दप्पा बुडगे,विलास सावळे,नंदकुमार पाटील,जगनाथ सरकाळे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments