मोफत ऑनलाईन सिलंबम राज्यस्तरीय स्पर्धा - २०२०
पुणे:(प्रतिनिधी/राजकुमार भंडारी) ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन मोफत सिलंबम स्पर्धा - २०२० आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा ऑनलाइन घेतल्या जातील विजेता खेळाडूंना प्रशस्तीपत्र पदक लॉग डाऊन संपल्यानंतर असोसिएशनच्या आयोजित कार्यक्रमात प्रधान करण्यात येईल. शेवट दिनांक १५/०५/२०२० संध्याकाळी ५:०० वाजे पर्यंत सर्व जिल्हा प्रतिनिधी असोसिएशनच्या ग्रूप वरती व्हिडीओ पाठवू शकतात व्हिडीओ १ ते २ मिनिटांचा असावा.
त्यामध्ये काठी.भारतीय पारंपरिक शस्त्र उदा.तलवार, दांडपट्टा, भाला याचा वापर करून ते व्हिडीओ काढावेत.तसेच रिकाम्या हाताने सिलंबम कताज (Kuthu Varsai) असे आव्हान आँल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन अध्यक्ष पी.वाय.अत्तार यांनी केले आहे अधिक माहितीसाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ७७७८६९०६०६ / ९६५७७११३१४
0 Comments