जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांची बारड येथील कोविट सेंटरला भेट
नांदेड: (प्रतिनिधी/पिराजी गाडेकर) मुदखेड तालुक्यातील बारड या गावी जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी बारड येथील सेंटरला भेट देऊन ग्रामीण रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टर सोबत कोरोना या आजाराविषयी अनेक बाबीवर सखोल अशी चर्चा करत असताना येथील नियोजनाबद्दल आणि रुग्णांवर होत असलेल्या औषध उपचार याविषयी अनेक प्रश्नाचे भडीमार करत बी.पी. शुगर चार्टची पाहणी केली असता काही त्यात उणिवा जाणवले आहेत यावेळी त्या चार्ट मधील उनिव सर्व डॉक्टर व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी यावेळी सर्वांना लक्षात आणून दिले आहे.
बारडमध्ये कोरोना बाधित एक रुग्ण१२ मार्च रोजी आढळला होता.या पार्श्वभूमीवर बारड ग्रामीण रुग्णालय यांची भेट घेऊन कोविट सेंटरला भरती असलेला एक २२ वर्षीय रुग्ण त्याची भेट घेऊन त्याच्या आरोग्याची विचारपूस करत औषध उपचार व्यवस्थित आहे का जेवणाची व राहण्याची व्यवस्था योग्य आहे का ?
यावेळी गावचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्याशी देखील यावेळी चर्चा करत असताना जास्तीत जास्त खर्च हा आरोग्यावर करावा असे यावेळी ते म्हणाले अशा वर्कर यांना यांचे मानधन दोन हजार रुपये एवढे जमल्यास त्यांना ग्रामपंचायत निधी मधून गावस्तरावर फिरण्यासाठी सायकलचे देखील नियोजन लावून त्यांना एक एक सायकल घेऊन द्यावे अशा प्रकारे बारड पॅटर्न तयार करावा याचाच आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत घेतील.
गावातील मूळचे बारड येथील काही कामगार परप्रांतीय भागामध्ये कामाला गेले होते ते परत आल्यानंतर त्यांना जि.प.हा माध्यमिक शाळेमध्ये विलगीकरण ठेवण्यात आले त्यांची देखील भेट यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतली आणि त्यातील विलास गाडेकर यांची आरोग्य विषय विचारपूस करत त्याच्या मेडिकल सर्टिफिकेट व त्याचा पुण्याहून बारडला आलेला शासकीय परवाना देखील यावेळी पहिला आहे.ग्रामपंचायतने गावाच्या हितासाठी सुरक्षेसाठी ग्रामपंचायतच्या वतीनेवतीने त्यांचे विलगीकरण जि.प.हा. माध्यमिक शाळेत करण्यात आले आहे.
यावेळी गावचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपाधीकारी पवन चांडक, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब देशमुख,तहसिलदार दिनेश झांपले, ता.आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार , बारड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किशोर कदम,तलाठी अंजली बार्शीकर, ग्राम विकास अधिकारी अनुप श्रीवास्तव, बारड पोलीस स्टेशनचे सा.
पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, सहा उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे ग्रामपंचायत सदस्य किशोर देशमुख शालेय स.अध्यक्ष विलास देशमुख प्रसार माध्यम समूहाचे प्रताप देशमुख, पिराजी गाडेकर, नामदेव बिच्चेवार, पोलीस पाटील वाय.वाय.लोमटे, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर इत्यादींची उपस्थिती होती.
0 Comments