एम आय एम माजी शहराध्यक्ष अफसर शेख कोरोनाग्रस्त
औसा:(ता.प्रतिनिधी/बी.जी.शेख)शहरातील एम आय एम चे माजी शहराध्यक्ष अफसर शेख यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफसर शेख यांना थोडीशी सर्दी व खोकला जाणवल्याने त्यांनी आपली स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. त्या चाचणीमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून आपल्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना काही दिवस स्वतःला होमक्वारनटाईन करून घेण्याची विनंती केली आहे. मी सध्या बरा आहे आपणही काळजी घ्यावी असेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. शहरांमध्ये अफसर शेख यांचे कार्य अतिशय सुंदर असल्याने त्यांच्या चाहत्यांचा वर्ग जास्त आहे. लहान मोठ्या गोरगरीब जनतेच्या कामासाठी सतत धावपळ करत असलेल्या नेत्याला कोरोणाची लागण झाल्याने सर्वजण त्यांच्या प्रकृतीविषयी प्रार्थना करत आहेत.
0 Comments