Latest News

6/recent/ticker-posts

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी रुग्णालयात मृत्यू प्रमाणपत्र देणेकरीता डॉक्टरांची नेमणूक करण्याची मनसेची मागणी

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी रुग्णालयात मृत्यू प्रमाणपत्र देणेकरीता डॉक्टरांची नेमणूक करण्याची मनसेची मागणी



पनवेल:(प्रतिनिधी)देशभरात अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या येथील वैद्यकीय गोष्टींच्या कमतरतेची जाणीव होत आहे. पनवेल महानगर पालिकेच्या माध्यमातून अनेक चांगले प्रयत्न करूनही येथील आरोग्य यंत्रणा हि व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडण्यासाठी धडपडत असताना प्रशासनाचे महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यात आले. व्यक्तीच्या मृत्यूनंतरही टाळूवरच लोणी खाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. व्यक्तींच्या मृत्यूनंतर डॉक्टर मार्फत मिळणाऱ्या प्रमाणपत्रासाठी नातेवाईकांना धडपड करावी लागते. प्रमाणपत्रासाठी मोजावी लागणारी किंमत पाहता मरावे कि जगावे ? हा प्रश्न नातेवाईकांना पडत आहे. त्यात पालिकेमार्फत मोफत लाकडे नसल्याने त्या खर्चाचा देखील सामना मृतांच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. दैनंदिन गरजा भागवणे कठीण असताना व्यक्तीच्या मृत्यूनंतर तरी त्यांच्या कुटुंबाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी शासकीय रुग्णालयात मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांची नेमणूक करावी तसेच महानगर पालिकेमार्फत सरणासाठी लागणारी लाकडे मोफत करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्मा. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कार्यालयात लेखी निवेदनातून करण्यात आली. त्यावेळी मनसे कामोठे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, उपशहराध्यक्ष मनोज कोठारी, विशाल चौधरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments