रोटरी क्लब अॉफ चाकुरचा पदग्रहण सोहाळा उत्साहात
अध्यक्ष विकास हाळे सचिव सुरज शेटे स्विकारला पदभार
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) रोटरी क्लब आँफ चाकुरच्या सन २०२०-२१ वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा रविवारी संपन्न झाला.यावेळी रोटरीचे सदस्य उपस्थित होते. या पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चाकुर रोटरीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर चाकुरकर हे होते .तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रांतपाल उमाकांत मद्रेवार हे होते.क्लबचे मावळते अध्यक्ष शैलेश पाटील व सचिव शिवदर्शन स्वामी यांनी नुतन अध्यक्ष विकास हाळे,सचिव सुरज शेटे यांना सनद प्रदान करण्यात येऊन पदभार सुपूर्त केला. यावेळी नुतन अध्यक्ष हाळे यांनी येणाऱ्या काळात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली.तर उपप्रांतपाल मद्रेवार,पाटील यांनी विचार व्यक्त केले.यावेळी अध्यक्षीय समारोप चाकुरकर यांनी केला.या कार्यक्रमाचे सुञसंचलन माजी अध्यक्ष सुरेश हाक्के यांनी केले तर आभार नुतन सचिव सुरज शेटे यांनी मानले.यावेळी रोटरीचे सुभाष काटे,प्रा.राजेश तगडपल्लेवार,डाँ.लक्ष्मण कोरे,चंद्रशेखर मुळे,गंगाधर केराळे,पांडुरंग पोलावार,सुधाकर हेमनर,प्रशांत शेटे,संगमेश्वर जनगावे,बालाजी उमाटे,रियाज पठाण,दिलीप शेटे हे उपस्थित होते.
0 Comments