चाकुर शहरामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त वृक्षरोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चाकुर:(ता.प्र. सलीमभाई तांबोळी) जगविख्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने चाकुर शहरामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.प्रदुषन मुक्त जीवन जगण्यासाठी मानवाला झांडाची अत्यंत गरज असते.अॉक्सिजन घेण्यासाठी मानवाला वृक्षची गरज आहे. शिक्षक कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी,ल.सा.क.म.व सार्वजनिक जयंती महोत्सव समिती मधील पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. म्हणून सार्वजनिक जयंती समिती व लसाकम च्या संयुक्त विद्यामानांने १०० वृक्ष लाऊन ते जतन करण्यांची जबाबदारी घेऊन लागवड केली.आनलॉक असल्यामुळे प्रशासनांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन फिजिकल डिस्टन्स,मास्कचे वापर करण्यात आले. वृक्षरोपन करण्यात आले.दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थीयांचा मनोबल उंचवावा म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला.विविध सामाजिक उपक्रमांव्दारा जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्यात आला. १०० वृक्षरोपन चाकुर शहरातील मातंग समाज समशानभुमी,यशवंतराव प्राथमिक शाळा,हक्कानिया उर्दु शाळा,राष्ट्रमाता इंदिरा गाःधी,भाई किशनराव देशमुख विद्यालय,रहेमतनगर अंगणवाडी,झरी रोड अंगणवाडी,प्रत्येक ठिकाणी दहा,पंधरा अशा १०० झाडे लावण्यात आले. जगविख्यात लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० वृक्षरोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सार्वजनिक जयंती महोत्सव समिती चाकूर व लसा कम च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज सूर्यवंशी जिल्हा सचिव लसा कम व प्रमुख वक्ते माननीय दयानंद कांबळे विभागीय कार्याध्यक्ष लसा कम हे होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मोठेराव, बापु मगर, संतराम मोठेराव, राम कसबे, राम मोठेराव ,संग्राम वाघमारे, बळीराम मोठेराव लसाकम तालुकाध्यक्ष चाकूर आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्याम मोठेराव जयंती महोत्सव समितीचे सचिव महेश नाईकवाडे जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष दिवाकर मोठेराव, अभिषेक मोठेराव, आकाश, गायकवाड, राजेश आरगडे,प्रकाश पाटोळे,विठ्ठल शिंदे इत्यादी समाज बांधव यांनी सहकार्य केले.
0 Comments