Latest News

6/recent/ticker-posts

प्रायव्हसी पॉलिसी सेवा किंवा Whatsapp,Facebook वर बंदी घाला;डॉ.संतुजी लाड स्टुडंट असोसिएशनची मागणी

प्रायव्हसी पॉलिसी सेवा किंवा Whatsapp,Facebook वर बंदी घाला;डॉ.संतुजी लाड स्टुडंट असोसिएशनची मागणी


लातूर:(प्रतिनिधि) नव्या प्रायव्हसी पॉलिसी नंतर युजरचा सर्व वैयक्तिक डेटा, पेमेंट ट्रान्झेक्शन, कॉन्टॅक्टस, लोकेशन आणि अन्य महत्वाची माहिती Whatsapp च्या हाती लागेल आणि त्या माहितीचा कंपनी भविष्यात कोणत्याही कारणासाठी वापर करु शकते. भारतात 20 कोटी पेक्षा जास्त WhatsApp युजर्स आहेत यातल्या प्रत्येकाचा पर्सनल डेटा अतिशय महत्वाचा असून जर त्या डेटाचा गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थ व्यवस्थेलाच नाही तर देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होवु शकतो. WhatsApp ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागु करण्यापासून रोखावं किंवा WhatsApp वर आणि WhatsApp ची मालकी असलेल्या Facebook वर थेट बंदी घालावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर मार्फत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मा.ना.यांना देण्यात आले या निवेदनावर साईनाथ घोणे, महेश विजापुरे, पवन वंजारे,योगेश घोणे, अविनाश डोंगरे, अजय घोणे, व्यंकटेश धाकपाडे आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments