डॉ.दिनकर पाटील यांचे निलंबन मागे घ्या बाबतचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना वंचित चे निवेदन
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील डॉ. दिनकर पाटील यांचे निलंबन रद्द करून त्यांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना वंचित बहूजन आघाडीने दिले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे कार्यरत असलेले जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.दिनकर पाटील हे गेल्या दिड वर्षभरापासून निलंगा उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णावर निःस्वार्थ पणे उपचार करतात. त्यांचे कार्य हे अत्यंत चांगले असून आतापर्यंत त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. एका महिलेने कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी मेडिकल बाहेरून आणावयास लावल्याची तक्रार निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे केली होती. याबाबत तहसीलदार गणेश जाधव यांनी अहवाल तयार करून जिल्हाधिकारी लातुर यांच्याकडे पाठवल्याने जिल्हाधिकारी लातुर यांनी दि. 27 एप्रिल 2021 रोजी निलंबनाची कारवाई केली ती अत्यंत चुकीची आहे. या बाबत समाज माध्यमावर अनेकांच्या प्रतिक्रिया डॉ.पाटील यांच्या बाजूने आहेत. शिवाय सद्य परिस्थितीमध्ये निलंगा उपजिल्हा रुग्णालयात डॉ.पाटील यांच्यासारखे तज्ञ डॉ. उपलब्ध नसल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या जीवितास गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे.तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या निवेदनाचा विचार करून तात्काळ डॉ. दिनकर पाटील यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत दाखल करून घ्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे आरोग्यमंत्री व तसेच आरोग्य संचालक यांना पण निवेदन देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी देवदत्त सुर्यवंशी लोक लढा समितीचे अध्यक्ष मोहन क्षीरसागर मोहन सोनटक्के मुन्ना सुरवसे अदी पदाधिका-यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments