औश्यात उष्णतेने पेटली गाडी;जिल्ह्यातील पहिली घटना
औसा:(प्रतिनिधी) दि.५ - उष्णतेचा पारा वाढल्याने आज शहरात एका दुचाकीने पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीने आजूबाजूचे वातावरण गंभीर झाले होते. शहरातील औसा आगाराच्या समोर ही घटना घडली. आजूबाजूच्या नागरिकांनी सजगता दाखवल्याने पेट घेतलेल्या गाडीला विझवण्यात यश मिळाले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आले. लातूर जिल्ह्यातील या उन्हाळ्यातील ही पहिलीच घटना असल्याने यावरून उष्णतेचा अंदाज बांधता येतो.वाढत चाललेल्या उष्णतेमुळे वाईट परिणाम होण्याची शक्यता जिल्ह्यात नाकारता येत नाही. म्हणून सर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.

0 Comments