कोविड योध्याचा अनोखा उपक्रम;वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णाला बिस्कीट वाटप
निलंगा:(तालुका प्रतिनिधी /इरफान शेख) गेल्या वर्षभरापासून उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते कार्यरत असलेले सिस्टर मीना ढगे यांनी आपला वाढदिवस कोविड केअर सेंटर दापका येथील कोरोना बाधित रुग्णासोबत साजरा केला सिस्टर मीना ढगे कोविड केअर सेंटर दापका येथील कोविड बाधित रुग्णाशी सवांद साधला , मी स्वतः कोरोना बाधित झाली होती कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेत आहे त्यामुळे आपण सर्व जण घाबरून जाऊ नका, एकदम निवांत राहा, काळजी करू नका आम्ही आपल्या सेवेत हजर आहोत गोळ्या वेळेवर खावा असे म्हणून त्या रुग्णाला धीर दिला यावेळी उपस्थित सुरवसे संकेत, पल्लवी श्रीमंगले, भोसले सुमित आदी जण होते.

0 Comments