केळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रमले शाळेची रंगरंगोटी करण्यात
केळगाव:{प्रतिनिधी/वसीम मुजावर} निलंगा तालुक्यातील केळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शाळा रंगरंगोटी करण्यात व सजावट करण्यात मग्न झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व निलंगा गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यात बाला उपक्रमाद्वारे विविध शाळेचे रंगरंगोटी करण्यात येत असून निलंगा तालुक्यातील एकूण ६० शाळेचा या बाळाला उपक्रमात सहभाग आहे. त्याचप्रमाणे केळगाव जिल्हा परिषद शाळेत बाला उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारपासून शाळेच्या इमारती रंगरंगोटी करण्यात येत आहे. बुधवारी शाळेमध्ये गांडूळ खत, गड किल्ले, तटबंदी, सूर्यमाला चित्रे आकृत्या हे शिक्षकाच्या वतीने साकारण्यात येत आहे बुधवारी दिवसभर शिक्षक एवढे मग्न झाले होते सायंकाळचे सात वाजले होते तरीही शिक्षकाचे काम सुरू होते. यासाठी गावकर आणि लोकवाटा शाळेसाठी द्यावा असेही शाळेचे मुख्याध्यापक भंडारे, शेंद्रे, विठ्ठल चांभारगे, सय्यद मॅडम, मोमीन मॅडम, काळगापुरे मॅडम , राठोड, पांचाळ, गोंदगे, मुरमे, तांबोळी यांनी आवाहन केले आहे. लवकरच गावाचा आणि शाळेचा लोकवाटा जमा झाला तर बाला उपक्रमातून केळगाव जिल्हा परिषदेच्या अतिशय सुंदर होईल असे शाळेच्या वतीने सांगण्यात येत आहे. यावेळी शिक्षक परिश्रम करून शाळा व शालेय परिसर बोलका करण्याचा प्रयत्न करत आहे.
0 Comments