महावितरणाच्या हलगर्जीपणाने निटूर येथील शेतकरी तापडिया यांचा 10 एकर ऊस जळून खाक;शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
के वाय पटवेकर
निलंगा: तालुक्यातील मौजे निटुर येथील मलरवाडी शिवारामध्ये सर्वे क्रमांक 18 येथील तापडिया यांच्या शेतामध्ये विजेच्या ताराचे घर्षण होऊन एकूण दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज बुधवार रोजी घडली आहे. अंदाजे बारा लाख रुपयाचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे. महावितरण विद्युत कंपनीचे संबंधित कर्मचारी सुद्धा दोन दिवसापूर्वी घटनास्थळी येऊन गेलेले होते कारण शेतातील विद्युत तारा झोळ पडल्याचे त्यांनीही पाहिले होते परंतु शेवटी उडवा-उडवीची उत्तरे देऊन प्रश्नाला बगल दिली असे शेतकरी तापडिया यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली. व त्याचे दुष्परिणाम म्हणून आज स्पार्क होऊन ह्याअग्नितांडवामुळे संबंधित शेतकऱ्याचे ऊस जळून लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे.
0 Comments