Latest News

6/recent/ticker-posts

सार्वजनिक बांधकाम विभाग देवणीच्या उपविभागीय अभियंता यांना रिपाईचे निवेदन

सार्वजनिक बांधकाम विभाग देवणीच्या उपविभागीय अभियंता यांना रिपाईचे निवेदन

देवणी: येथील सार्वजनिक बांधकाम विभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले,सदरील निवेदनात मौजे तळेगाव(भो.) ते चवणहिप्परगा या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक अपघाती वळण आहेत,या अपघाती वळणामुळे आतापर्यंत अनेक अपघात सदरील रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून वारंवार घडत असल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर काहींना अनैसर्गिक अपंगत्व आले आणि परिणामी त्याचे कुटुंब अंधारात गेले,तरी मा.साहेबांनी तात्काळ तळेगाव ते चवणहिप्परगा या रस्त्यावर ज्या-ज्या ठिकाणी धोकादायक अपघाती वळण आहेत त्या-त्या वळणांना अपघाती क्षेत्र घोषीत करून त्या ठीकाणी दिशादर्शक, रेडीयम, वाहने सावकाश चालवा अशी सुचना फलक लावावीत अन्यथा रिपाई तालुका देवणी च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा देवणी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांनी दिला यावेळी देवणी तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड, तालुका संपर्कप्रमुख दिपक कांबळे, देवणी शहराध्यक्ष विक्रम गायकवाड, सचिव पुष्पक सुर्यवंशी, युवा अध्यक्ष भिमदर्शन बोरे, ग्रामीण अध्यक्ष रोहीत डोंगरे, महेश काळे, तुकाराम कांबळे, जयदीप कांबळे, आनंद कांबळे, सतिश गायकवाड आदी रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments