Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे अशिहारा कराटे च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

नळेगाव येथे अशिहारा कराटे च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप



नळेगाव
: अशिहारा कराटे असोसिएशन, लातूर द्वारा सेल्फ डिफेन्स मल्टीपर्पज अकॅडमी, नळेगावच्या कराटेपटूना येलो बेल्ट प्रमाणपत्राचे वितरण नळेगाव येथील कै. नरसिंहराव चव्हाण विद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते यशस्वी कराटेपटूना प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण तर प्रमुख उपस्थिती अल-फारुक उर्दू प्रार्थमिक शाळेचे मुख्याध्यापक वाहाब जागीरदार, सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण, माजी नळेगाव ग्रामपंचायत सदस्य खुदबुद्दीन घोरवाडे, ग्रामसेवक पांडुरंग सावंत, संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष राजू शेलार, अशिहारा कराटे असोसिएशन लातूरचे अध्यक्ष के वाय पटवेकर हे मंचावर उपस्थित होते.

यावेळी त्र्यंबक कांबळे या कराटेपटूला ब्लॅक बेल्ट 1 डॅन पदवी प्रमुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आली. यल्लो बेल्ट- खाजोद्दीन मजकुरी, वैभव बिराजदार, नवाज कोतवाल, आदित्य भदाडे, गणेश डोंगरे, प्राची गायकवाड, अमृता सावळे, वसुंधरा सावंत, गौरी नागलगावे, आदिती सावळे, गायत्री बिराजदार, मानसी भालेकर, सुकन्या वाघमारे, मृणाली सावळे, यशश्री भालेकर, समिधा गुडमेवार, शुभांगी भालेकर, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव चोडे, रोहित भालेकर, सितीज भंडे, यशोदीप गायकवाड, नागेश डोरले, अर्थ भदाडे, रामकिशन डोरले, समर्थ बिराजदार, सुशांत शिरुरे, पृथ्वीराज शिंदे, रुद्रा सावळे, कृष्णा डोरले आदी कराटेपटूना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला पालक-विद्यार्थ्यांची उपस्थिती होती पालक विनायक कांबळे यांनी त्यांना आलेल्या अनुभवातून प्रमाणपत्राची महत्व किती या विषयावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अध्यक्षीय समारोप भाषणामध्ये अनिल चव्हाण यांनी कराटेपटूचे अभिनंदन करत नळेगाव येथे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याकरिता आवश्यक वाटेल ते मदत करण्याची ग्वाही दिली. 


सदर असोसिएशनचे अध्यक्ष यांनी खेळाचे महत्व व शासनाने दिलेल्या खेळाडूंना सुविधेची व खेळाडूंना भविष्यात होणाऱ्या फायद्याची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षक संतोष तेलंगे यांनी केले.




Post a Comment

0 Comments