Latest News

6/recent/ticker-posts

शफीउल्ला पटेल यांचे निधन

 शफीउल्ला पटेल यांचे निधन


औसा: येथील शफीउल्ला चांद पटेल यांचे दि.12 वार मंगळवार रोजी पुणे येथे वयाच्या 44 वर्षी निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन औसा येथील राशन दुकानदार चांद पाटेल यांचे ते चिरंजीव होते. पत्रकार आसिफ पटेल यांचे ते जेष्ठ बंधू होते. पुणे येथे त्यांचा बोरवेल चा व्यवसाय होता. मागील काळात त्यांनी लातूर जिल्ह्यात मुस्लिम विकास परिषद या संघटनेचे काम खूप हिरिरीने केले होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले होते. यांचा बोरवेल चा व्यवसाय प्रगतीपथावर होता. असं अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. अंत्यविधी आज औसा येथील सय्यद सादात कबरस्थानात 11:00 वाजता होईल. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments