Latest News

6/recent/ticker-posts

शोध वार्ता पुरस्कार अरुणकुमार मेहत्रे यांना जाहीर

शोध वार्ता पुरस्कार अरुणकुमार मेहत्रे यांना जाहीर


' ते नाजूक हात भिक मागू लागतात तेव्हा ' या बातमीस  माधव लांडगे यांच्या स्मरनार्थ अॅड  विष्णू लांडगे यांच्या वतीने ३ हजार रु रोख, गौरव चिन्ह गौरवपञ असे स्वरूप आहे. 

लातूर:( के.वाय.पटवेकर ) मूळचे देवणी तालुक्यातील आंबेगाव येथील अरुणकुमार बालाजीराव मेहत्रे हे सध्या पनवेल, नवी मुंबई येथे दैनिक लोकमत करिता वृत्तसंकलन म्हणून काम पाहतात. त्याने "ते नाजुक हात भीक मागू लागतात तेव्हा .... " या सदराखाली बातमी केली होती मुंबई, नवी मुंबई सारख्या ठिकाणी मुलांकडून भीक मागुन घेण्याचे प्रकार सर्रास घडतात. त्याची वाचा कुठेच फोडली जात नाही. मुले विकत घेणे, पळवून आणणे, मुले चोरी करुन मुंबई - नवी मुंबई परिसरात त्यांच्याकडून भिक मागून घेतले जाते. या संवेदनशील विषयाला हात घातला त्यातील  बातमीच्या माध्यमातून भांडा फोड केला ... आणि नवी मुंबईत अशा भिक मागुन घेणा-या टवाळखोरांवर कारवाई करण्यास भाग पाडले .... होते. याच बातमीला रंगकर्मी प्रतिष्ठाण व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय शोध वार्ता प्रथम पुरस्कार मिळाला आहे. हा मातृभूमीतला दुसरा पुरस्काराचा बहुमान त्यांना मिळतोय.

रंगकर्मी साहित्य कला,क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघ, उदगीर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण समारंभ वार रविवार दिनांक 10 एप्रिल दुपारी 12:35 वाजता रघुकुल मंगल कार्यालय, उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे तसेच पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष असून महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या समारंभाला कृषी उत्पन्न बाजार समिती, उदगीरचे सिद्धेश्वर पाटील, मराठी जगतातील प्रसिद्ध अभिनेते-सुरेश विश्वकर्मा व अभिनेते-विजय कदमची उपस्थिती राहणार आहे. अरुणकुमार मेहत्रे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments