लाल परीचे गावात आगमन होताच वाहक-चालकांचा भादेकरांनी केला सन्मान
बी डी उबाळे
औसा: दि 21 गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या विलिनीकरण च्या मागणीचा प्रश्न सुटावा या साठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यातील काहीसा काळ फार कठीण लोटला. सर्वसामान्यांना या संपाचा त्रास सोसावा लागला. प्रथमच भादा येथे गुरुवार दि 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7:30 वा बसचे आगमन होताच एसटीची पुजा करून चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी एस टी पाहण्यासाठी गावातील अनेक विद्यार्थी- नागरिक बस स्थानकावर हजर झाले होते. आणि आश्चर्याने या एसटी बस कडे पाहत होते. एसटी बस सुरू असणे हे देशांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्याची प्रतीक म्हणजे ही एसटी बस आहे.यामुळे ही सर्वसामान्यांची जीवनदायिनी किती आवश्यक आहे हे या वेळी अनेक नागरिकांकडून बोलून आपली भावना व्यक्त केली.
यावेळी हरिदास मगर,गुणवंत उबाळे,माजी उपसरपंच सुरेश लटूरे,बालाजी शिंदे,डिंगम्बर गुंडकर,विद्यार्थि उपस्थित होते.

0 Comments