Latest News

6/recent/ticker-posts

भादेकर भूमीपूत्र संगीताच्या दुनियेत

भादेकर भूमीपूत्र संगीताच्या दुनियेत


बी डी उबाळे

औसा: सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात भादेकर भूमिपुत्राचे माझ्या प्रेमाची किंमत कळल तुला राणी जीव माझा गेल्यावर... रडतय राणी काळीज माझं तुझी आठवण आल्यावर... हे संगीतमय गीत गाजत आहे. भादा गावातील तरुण हा वेगवेगळ्या क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जीवापाड कष्ट करून तो यशस्वी होतोच आहे. असाच एक तरुण नवखा भादा येथील तरुण मंगेश कांबळे हा लहानपणापासूनच कठीण आर्थिक परिस्थितीवर मात करत त्याने शिक्षण घेऊन संगीतक्षेत्रात आपले करियर करावे या हेतूने तो आता पर्यंत सध्या प्रयत्न करत आहे आणि त्याचे आई-वडील संगीता-दिलीप कांबळे हे भीम गीतासाठी या भागांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचाच हा एक वारस आता संगीत क्षेत्रामध्ये चांगले प्रसिद्धीस नाव येईल अशी आपेक्षा या सदरील पहिल्या यु ट्यूब वरील व्हिडिओ वरून भादा तालुका औसा येथील संगीतप्रेमींना नक्कीच वाटत आहे.

Post a Comment

0 Comments