Latest News

6/recent/ticker-posts

प्रशासक असलेल्या नगर परिषदेला वेळेचे महत्त्व कळावे यासाठी दिले "घड्याळ"

प्रशासक असलेल्या नगर परिषदेला वेळेचे महत्त्व कळावे यासाठी दिले "घड्याळ"


शेख बी जी.

औसा: दि.23 - औसा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मागील पाच महिन्यापासून कार्यकाल संपल्याने येथील नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. या प्रशासकाच्या माध्यमातून औसा नगरपालिकेचा कारभार चालू आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात अनेक समस्या भेडसावत आहेत. शहरात तावरजा व तेरणा या दोन ठिकाणाहून पाण्याचा पुरवठा होत असला तरी शहराला 20 ते 25 दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना व प्रशासकाला वेळेचे महत्त्व कळावे यासाठी घड्याळ भेट दिली.


कर्मचाऱ्यांना व प्रशासकाला शहरात होत असलेल्या असुविधेबाबत जाणीव व्हावी या उद्देशाने निषेधात्मक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा बरोबरच अनेक कामांमध्ये अनियमितता निर्माण झाली असल्याने वेळेचे महत्त्व कळावे म्हणून हे घड्याळ देण्यात आल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष जावेद शेख यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. शहरात अस्वच्छता पसरली असून घंटागाडी बंद करण्यात आल्याचेही यावेळी कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई केली नसल्याने ती साफ सफाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अवघ्या पाच महिन्यात प्रशासकांनी शहरात असुविधा निर्माण केली असल्याने प्रशासकाला नेमणारे सत्तेत आले तर शहराचा विकास होणार नाही असे माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी म्हटले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष किर्ती ताई कांबळे, शेख जावेद,गोविंद जाधव, उमर पंजेशा, बासीद शेख, मेहराज शेख, वकील इनामदार, भरत जाधव, अफसर शेख, युवा नेते सुलेमान शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments