केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत औसा येथील शुभम संजय भोसलेंचे घववीत यश
शेख बी जी
औसा: दि.30 - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत औसा येथील शुभम संजय भोसले हा विद्यार्थी यशस्वी झाला आहे. त्याने देशात 149 वा क्रमांक पटकावला आहे. शुभम हा औसा येथील संजय भोसले यांचा मुलगा आहे. या विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण मुक्तेश्वर विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात झाले. शुभमने अभियांत्रिकी शिक्षण मुंबई येथे पूर्ण केले. लहानपणापासूनच शुभमला अधिकारी होण्याचा इच्छा होती. त्यासाठी दिल्लीला जाऊन दोन वर्ष यूपीएससीची तयारी केली. शुभम हा पहिल्या प्रयत्नात अपयशी झाला होता. या विद्यार्थ्यांनी आशा सोडली नाही व कोरोना काळात भरपूर अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नातच तो यशस्वी ठरला. या सर्व यशामध्ये शुभम ची आई शोभा, वडील संजय व बहीण स्नेहा व मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. प्रशासकीय यंत्रणेत काम करत असताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन अशा प्रकारच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या यशाबद्दल सुनील पाटील, अभय लांडे ,कोळपे गजेंद्र व इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.
0 Comments