Latest News

6/recent/ticker-posts

राज्यमंत्री संजय बनसोडे यानी सोडवला शिरोळच्या वीजेचा प्रश्न;गावकऱ्यांनी मानले आभार.

 राज्यमंत्री संजय बनसोडे यानी सोडवला शिरोळच्या वीजेचा प्रश्न;गावकऱ्यांनी मानले आभार.


शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) येथील गावठाणातील कासीम डी.पी.मागच्या चारपाच दिवसापासुन बंद होती. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत होता. महावितरणला याची कल्पना दिली असता डी.पी.उपलब्ध असल्यास देऊ असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुका सरचिटणीस पठाण यांनी डी.पी.साठी राज्यमंत्री संजय बनसोडे साहेबांना फोन करुन कल्पना दिली असता तात्काळ त्यांनी महावितरणच्या आधिकाऱ्यांना डी.पी.उपलब्ध करण्याचा निर्देश त्यांच्या स्वीय सहायकामार्फत दिला. महावितरणने मंत्रीमहोदयांच्या आदेशाचे पालन करुन तात्काळ शिरोळसाठी डी.पी.उपलब्ध करुन दिला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीला मंत्रीमहोदय संजय बनसोडे साहेब धावुन येतात ह्याचा प्रत्यय आज शिरोळवासियांना आला. यावरुन मंत्री महोदयांचा  सामान्य माणसांशी किती जवळीकता आहे हे दिसुन येते. जनतेच्या प्रश्नासाठी कधीही हाकेला ओ देणारा नेता म्हणजे राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब.

    शिरोळवासीयांनी मनापासुन त्यांचे आभार व्यक्त केले‌ या पुढेही मंत्रीमहोदयांची अशीच वेळो-वेळी मदत राहावी हीच इच्छा यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments