औसा तालुक्यातील वाढलेली नरेगा कामातील गुत्तेदारी बंद करा; ग्राम रोजगार सेवक संघटनेची आयुक्तांकडे मागणी
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने मागील खुप दिवसांपासुन प्रलंबीत मागण्या मान्य करण्याचे निवेदन गटविकास अधिकारी औसा यांच्या मार्फत नरेगा आयुक्त व औशांचे आ.अभिमान्यू पवार यांना देण्यात आले.
त्या मागण्या पुढील प्रमाणे असून नरेगा मधील मंजूर कामे ही संबंधित ग्रामपंचायतला करणे बंधनकारक करावे, नरेगा मधील गुत्तेदारी बंद करावी, ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांस मासिक मानधन दयावे, औसा पंचायत समितीत आवक-जावक रजिस्टर असावे, नरेगा कर्मचारी व ग्राम रोजगार सेवक यांची प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घ्यावी, नरेगा मध्ये बाहेरील गुत्तेदार मजुरांचे पैसे उचलून द्यावे म्हणून ग्राम रोजगार सेवकावर दबाव टाकण्यांचे प्रकार औसा तालुक्यात घडत आहेत. ते तात्काळ थांबवावे, रोजगार सेवक यांना त्यांच्या स्तरावर मस्टर काढण्यासाठी आयडी व पासवर्ड देण्यात यावा अशी मागणी औसा तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना यांनी केली. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष चाॅद शेख, तालुकाध्यक्ष भागवत शिंदे,सचिव गोरख कांबळे,सोमनाथ डोके, शिवाजी साठे,अभिमान्यू कांबळे,पांचाळ विठ्ठल,मगर बसवेश्वर,शेरीकर मुक्तार,दिपक सोनवते,बने नरसिंग,देडे धनराज,उजळंबे तानाजी, कांबळे तात्याराव अंकुश जाधव,अजिज पठाण गजानन क्षीरसागर यांच्या सह इतर रोजगार सेवकांच्या सह्या या निवेदनावर करण्यात आल्या आहेत.
0 Comments