Latest News

6/recent/ticker-posts

भादा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ.विकास निलंगेकर यांनी दिले योगाचे धडे

भादा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ.विकास निलंगेकर यांनी दिले योगाचे धडे


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अचानकपणे येऊन प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णासाठी आणि आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्याकडून काही वेळेसाठी योगा करून घेतला जातो. याकरिता आज गुरुवार दि 02 जून 20 22 रोजी सकाळी साडेदहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र भादा या ठिकाणी आलेल्या रुग्णास, नागरिकांना डॉ विकास निलंगेकर यांनी योगाभ्यास धडे शिकविले आणि त्याच्याकडून योगा करुन घेण्यात आला. यावेळी कर्मचारी आणि अनेक नागरिकांनी या योगा मध्ये सहभाग घेतल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी विकास निलंगेकर यांच्याशी चर्चा केली असता योगा अभ्यासाद्वारे मी अनेक रुग्णांना पूर्णपणे बरे केले असल्याचे दाखले त्यांनी यावेळी दिली यामुळे मानवी जीवनामध्ये योगा अभ्यास किती आवश्यक आहे. याची प्रचिती प्रत्येक नागरिकाला आल्याशिवाय राहणार नाही. याकरिता प्रत्येक नागरिकांनी सकाळी किमान अर्धा तास तरी योगाभ्यास जरूर करावा अशी विनंती डॉ.विकास निलंगेकर यांनी सदरील प्रतिनिधींशी बोलताना यावेळी केली.

Post a Comment

0 Comments