अखेर किती दिवस औसेकर सहन करणार रोजचा चक्काजाम
शेख बी जी.
औसा: दि. औसा शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील अविकसित शहर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे. शहरालगत रत्नागिरी ते नागपूर असा चौपदरी रस्ता ना. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे होत आहे. या रस्त्याच्या कडेला औसा शहराची वस्ती वाढत आहे. मात्र या ठिकाणी दररोज होणारा चक्काजाम डोकेदुखी ठरत आहे. अनेकांची कामे खोळंबली जात आहेत. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते हा चक्काजाम होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. येथील पोलिस प्रशासनही या चक्काजामला वैतागले आहे.
रस्त्याच्या कडेला असलेले गाडे व बेशिस्त वाहतूक या चक्काजाम ला जबाबदार आहेत. एसटी वाहतुकीस याबाबतीत वेळोवेळी सूचना करूनही ते ऐकत नसल्याने कोठेही बस थांबल्याने ही वाहतूक विस्कळीत होत आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळी शहराच्या बाजूने हा रस्ता जावा यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या माजी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या सभेत बायपास रस्त्याची मागणी नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. औश्यातील नागरिक कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक असावा अशी मागणी करत आहेत.
या बेशिस्त वाहतुकीमुळे एकूणच औसेकरांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावर उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी औसेकरांकडून होत आहे.
0 Comments