Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत भादा येथे मोफत आधार नोंदणी कॅम्पचे आयोजन

ग्रामपंचायत भादा येथे मोफत आधार नोंदणी कॅम्पचे आयोजन


 
बी डी उबाळे

औसा: ग्रामीण भागामध्ये नागरिकांची आर्थिक परिस्थिती ही कमजोर असते आणि शासकीय सेवा सुविधा यांचा अभाव ग्रामीण भागात असतो आणि नागरिकांना घर आणि शेत याशिवाय कोणतेही याध्वनीक जगातली माहिती नसते यामुळे अशा नागरिकांची गावांमध्येच व्यवस्था व्हावी या कारणांनी औसा तालुक्यातील भादा येथे लहान बालक दोन ते पाच वर्षे वयोगटातील त्याचे आधार कार्ड काढण्याची मोहीम ग्रामपंचायत भादा आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय औसा अंतर्गत सुरू असून वय वर्ष दोन ते पाच या वयोगटातील सर्व बालकांचे आधार कार्ड नोंदणी मोफत करण्यात येणार असून भादा गावातील पालकांनी आपल्या बालकाचे आधार कार्ड गुरुवार दिनांक 14 व शुक्रवार दिनांक 15 जुलै 2022 रोजी मोफत काढून घ्यावे असे आवाहन अंगणवाडी पर्यवेक्षिका सुचिता कटके आणि ग्रामपंचायत सरपंच सौ. दरेकर, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, उपसरपंच बालाजी शिंदे,सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments