जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील अशासकीय पदे भरण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर:(जिमाका)दि. 18 - लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक / आजी सैनिक पत्नी / विधवांना तसेच इतर नागरिक यांना कळविण्यात येते की, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर यांचे आस्थापनेवरील सैनिक मुलां / मुलींचे वसतिगृह व विश्रामगृह येथे पूढील अशासकीय रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 21 जूलै 2022 पर्यंत अर्ज या कार्यालयास सादर करण्यात यावे असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
चौकीदार (पुरुष-01 व महिला -01) 02 प्रतिमाह मानधन रु. 8 हजार 911, स्वयंपाकी (महिला) -01 प्रतिमाह मानधन रु. 5 हजार 941, सफाई कामगार (पुरुष-01 व महिला -01) 02 प्रतिमाह मानधन रु. 5 हजार 658 व माळी -01 प्रतिमाह मानधन रु. 4 हजार असे राहील.
0 Comments