खरोसा बुद्ध लेणीस आ. अभिमन्यू पवार यांची भेट
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील ऐतिहासिक अशा खरोसा बुद्ध लेणी संदर्भात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 20 23 रोजी दुपारी भेट दिली. लातूर जिल्ह्यातील दुर्मिळ पण ऐतिहासिक असणाऱ्या "बुद्ध लेणी खरोसा,बौद्धांचा वारसा लेण्या खरोसा" यावेळी खरोसा बुद्ध लेणी विकास कामा संदर्भात भेट घेतली आणि विकासासाठी चर्चा केली.
यावेळी खरोसा बुद्ध लेणीचे काळजी वाहू आणि विकासक असणारे भंतेजी सुमेधजी नागसेन आणि सोबत लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक नितीन वाघमारे,औसा नगर पालिकेच्या नगरसेविका कल्पना डांगे, अशोकराव बनसोडे, राजेंद्र बनसोडे, संतोष माने व इतर उपासक उपस्थित होते.


0 Comments