Latest News

6/recent/ticker-posts

भादा जी प शाळेतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगले गुण घेणाऱ्या बौध्द मुलींचा सन्मान

भादा जी प शाळेतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगले गुण घेणाऱ्या बौध्द मुलींचा सन्मान


बी डी उबाळे 

औसा : शिक्षण प्रेमी शिक्षक भादेकर भूमिपुत्र महादेव उबाळे यांच्या प्रेरणेतून भादा येथील प्रतिकूल परिस्थिशी सामना करीत वर्गातील सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या विद्यार्थिनींना बुध्दीच्या जोरावर मागे सारून आपल्या बुद्धिमत्तेची कीर्ती दाखविणाऱ्या अति प्रतिकूल परिस्थितीत मध्ये म्हणजे दररोज रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील मुलींनी चांगले गुण घेतले आहे. त्यांचा समाजाला तर सार्थ अभिमान आहेच ! आणि मूला पेक्षा मुलीच हुशार ! हे सिद्ध हे त्यांनी सिद्ध केले आहे. यामुळे यांचा सन्मान करण्यासाठी यावर्षी स्वतः पुढाकार घेऊन बौध्द समाजातील दहावी पास गुणवंत विद्यार्थीनीचा एक छोटेखानी शनिवार दिनांक 01जून 2024 रोजी रात्री 08:00 वाजता भीम नगर, भादा येथे सत्कार समारंभ ठेवून समाजातील इतर मुला-मुलींनाही या सत्कार समारंभ अभ्यासाकरिता आणि स्वतःचे भविष्य उज्ज्वल भवितव्यासाठी शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूलमंत्राचा पुरेपूर उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा. याकरिता हा एक सामाजिक उपक्रम राबविण्याचे भाग्य भादेकर भूमिपुत्र महादेव उबाळे यांना लाभल्याचे त्यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी भादा येथील आयोजक महादेव उबाळे, गावचे उपसरपंच बी एम शिंदे, चेअरमन दत्तकुमार शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, औसा तालुक्यात सामाजिक कार्यात वकिली व्यवसायात अग्रेसर असणारे अँड जयराज जाधव, प्रा  विजयकुमार मस्के, नितीन जाधव, माजी उपसरपंच सुरेश लटुरे व भादा येथील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments