लातूरमध्ये PATM फाउंडेशनतर्फे मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लातूर : मागील वर्षीप्रमाणेच यंदाही PATM फाउंडेशन, लातूर यांच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा सत्कार समारंभ 28 जून 2025 रोजी, शनिवार, सायंकाळी 4 :00 वाजता एम. के. फंक्शन हॉल, 60 फूट रोड, लातूर येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम पटवेकर अत्तार तांबोळी मणियार फाउंडेशन यांनी आयोजित केला असून, समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन सदर फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज{बाबा} मणियार यांनी केले आहे. पत्रकार - के. वाय. पटवेकर – 9270888587 , शादाब पटवेकर – 7385039166 , गफ्फार सर – 9923243054 , अॅड. कलीम मणियार – 9527938158 ,हबीब मणियार – 9422636756
0 Comments