Latest News

6/recent/ticker-posts

व्हिजन ऑफ एज्युकेशन सराव परीक्षेत शिराळा शाळेतील विद्यार्थ्यांची चमक

व्हिजन ऑफ एज्युकेशन सराव परीक्षेत शिराळा शाळेतील विद्यार्थ्यांची चमक


शिराळा
:{ प्रतिनिधी/बालाजी राजमाने }‘व्हिजन ऑफ एज्युकेशन नवोदय महासराव 2025’ या प्रतिष्ठित परीक्षेमध्ये रविंद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूल, शिराळा (ता. लातूर) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शिराळा केंद्रातून आदित्य हरी गोंधळी याने प्रथम क्रमांक, तर वेदिका ज्योतिराव देशमुख हिने तृतीय क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शाळेचे संस्थापक सचिन माने आणि परमेश्वर शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या यशामागे शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments