Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय किसान एक्झिबिशनला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यस्तरीय किसान एक्झिबिशनला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे : पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किसान एक्झिबिशनला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात राज्यभरातील विविध कृषी उत्पादन कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रदर्शनामध्ये माती परीक्षण, अत्याधुनिक सिंचन व्यवस्था, शेतीतील यांत्रिकीकरणासाठी लागणारी साधने आणि पेरणीपासून वाहतुकीपर्यंत सर्व प्रकारची आधुनिक मशिनरी यांचे मनमोहक प्रदर्शन करण्यात आले. मॅन्युअलपासून ते पूर्णपणे ऑटोमॅटिक अशा विविध यंत्रसामग्रींचा समावेश या प्रदर्शनात होता.

या कार्यक्रमाचे आयोजन किसान संस्थेमार्फत करण्यात आले होते. दररोज लाखो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध साधने, उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी केली. अनेकांनी आकर्षक सवलतींचा लाभ घेत तात्काळ खरेदी केली, तर काहींनी पुढील आवृत्त्यांसाठी बुकिंगही केले. देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीने पार पडलेल्या या प्रदर्शनातून शेतीतील आधुनिकीकरणाच्या दिशेने ग्रामीण भागातील शेतकरी समुदाय एक पाऊल पुढे टाकताना दिसून आला.

Post a Comment

0 Comments