राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुणे जिल्ह्याला विजेतेपद तर ठाणेला उपविजेतेपद
३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट स्पर्धा गाजवली; निकिता पवार आणि कानिफनाथ पोकले ठरले राज्यातील ‘सुपर’ खेळाडू
लातूर : जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे ३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत क्यूरोगी या प्रकारात पुणे जिल्ह्याने ९६ गुण प्राप्त करत सर्वसाधारण विजेतेपद जिंकले तर २९ गुणांवर ठाणे जिल्ह्याने उपविजेतेपद प्राप्त केले असून या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार निकिता पवार जळगाव व कानिफनाथ पोकले पुणे या खेळाडूने पटकावला आहे तर पुमसे या प्रकारात रायगड जिल्ह्याने विजेते पद तर पालघर जिल्ह्याला उपविजेतेपद प्राप्त झाले असुन उत्कृष्ट पुमसे खेळाडू म्हणून मृणाली हरणेकर व वंश ठाकुर यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
३५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर या जिल्हा संघटनेने दिनांक ०५ ते ०७ डिसेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रतिभावान आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता स्पर्धेचे उद्घाटन लातूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ॲड किरण जाधव यांनी केले होते तर पदके व पारितोषिके वितरण तायक्वांदो राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या स्पर्धेत राज्यातील २८ जिल्ह्यातून ३२० खेळाडू सहभागी झाले होते.
अजिंक्यपद स्पर्धा...
अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासनाने निर्गमित केलेल्या वयोगट व वजनी गटातील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग देण्यात आला तर तायक्वांदो खेळातील क्यूरोगी प्रकारात पुरुष व महिला असे एकूण १६ खेळाडू व क्युरोगी प्रकारात ३५ प्रथम क्रमांकाचे खेळाडु निवड करुन हैदराबाद येथे संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठी पाठवले जात आहे. यावेळी स्पर्धा आयोजक नेताजी जाधव, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया चे सहसचिव तथा स्पर्धा निरीक्षक मिलिंद पठारे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण बोरसे व सुभाष पाटील, पत्रकार के वाय पटवेकर, लिंबराज पन्हाळकर यांची उपस्थिती होती तर स्पर्धा यशस्वीतेसाठी एस व्ही कुलकर्णी, धनश्री मदने, जान्हवी मदने, गीतांजली नागरगोजे रागिनी क्षीरसागर, अनुश्री कुलकर्णी, विश्वजीत जाधव, आकाश मिरगे यांच्यासह जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी परिश्रम घेतले.



0 Comments