रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूल, शिराळा येथे ‘आनंदनगरी’ उत्साहात साजरी
शिराळा : रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूल, शिराळा येथे ‘आनंदनगरी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते. शाळेचे संस्थापक सचिन माने, मुख्याध्यापिका एस. एस. माने, तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते गौरीशंकर धुमाळ आणि दीपक धुमाळ यांनी स्वतः भेट देऊन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘आनंदनगरी’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाकौशल्यांचे प्रदर्शन केले. काही विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याचे स्टॉल लावले होते, तर काहींनी शालेय साहित्याचे, वस्तूंचे व खेळण्यांचे दुकाने उघडून व्यावहारिक शिक्षणाचा अनुभव घेतला. शाळेच्या आवारात आनंद, हशा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.



0 Comments