चाकूर तालुक्यात महात्मा बसवेश्वर यांची जयंती इतरांपेक्षा आगळी वेगळी
जगत् जोति माहात्मा बसवेश्रर यांच्या जयंतीनिमित्त मित्रप्रेम ग्रुप आटोळाच्या वतीने सॅनेटराईजचे वाटप.
चाकुर:(ता.प्रतिनिधीःसलीमभाई तांबोळी) चाकूर तालुक्यातील आटोळा येथे मित्र प्रेम ग्रुप यांच्यावतीने जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त , आटोळा येथील काही तरूणांनी महात्मा बसवेश्वर यांची जयंती इतरांपेक्षा आगळी वेगळी साजरी करण्याची कल्पना मांडली व कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आसल्याने महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार महात्मा बसवेश्वर यांची जयंती सर्वांनी घरीच साजरी केली.व जयंतीनिमित्त मित्रप्रेम ग्रुपच्या काही तरुणांनी थोडासा निधी संकलित करून आपल्या कल्पक विचाराने त्या निधीचा योग्य वापर कसा करता येईल याची कल्पना मांडली व आटोळा गावातील मित्रप्रेम ग्रुपच्या वतीने अंध,अपंग,अनाथ व गोरगरीब जनतेला कोरोनापासून मुक्त होण्यासाठी सॅनेटराईजचे वाटप करण्यात आले व कोरुना रोग होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या जाव्यात याची माहिती सांगण्यात आली. तसेच जनजागृती करून जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.एकशे सत्तावीस लोकांना वापट करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे चाकूर सह परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.तसेच सचिन शेटे, संतोष कलवले,गणेश फुलारी,स्वप्निल कोरे,अलंकार शेरे,विकास कोरे,संदीप गंगापूरे, शुभम कुमदाळे, शिवा रावळे,आकाश मोतिपवळे,सिद्दीक कुरेशी,ओमकार शेटे,नागेश एकुरगे,मन्मथ शेटे,कॄष्णा चिन्तनपले,विकास गंगापूरे,सुनील ताडमाडगे,अक्षय लोहारे,सोमनाथ शेटे,अन्तेश्वर गंगापूरे,महेश शेटे,शिवप्रसाद शेटे,शिदेश्वर लोहारे आदींनी सहकार्य केले व घरीच राहुन महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात यावी असे आव्हान आटोळा येथील मित्रप्रेम ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
0 Comments