देवणी येथे महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून
चाळीस कुटुंबांना अन्नधान्याचे कीट वाटप
देवणी:(प्रतिनिधी:विक्रम गायकवाड) येथील श्री गुरूलिंगेश्वर मठात दिनांक २६ रोजी विश्वगुरू, समतानायक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर चालू असलेल्या संचारबंदीचे पालन करत सोशल डिस्टंनसींगने जयंती साजरी करण्यात आली. श्री गुरूलिंगेश्वर मठाचे मठाधिश म.नि.प्र. सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते सकाळी ९.०० वा. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करून व षटस्थल ध्वजारोहन करून जयंती उत्सवास सुरूवात करण्यात आली . दुपारी ५.०० वा. महिला भगिनींच्या वतीने महात्मा बसवन्नांचा पाळणा घालण्यात आले. यानंतर सायंकाळी ७.०० वा. मठाधिश म.नि.प्र. सिद्धलिंग महास्वामीजींच्या हस्ते कोरोना लाॅकडाऊन परिस्थितीत आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकातील हातावर पोट असणार्या ४० कुटुंबाना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले. यावेळी बसवप्रेमी सदभक्त, अनुयायी महिला पुरूष उपस्थित होते.
0 Comments