चापोली येथे खाजगी व शासकीय रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव
युवकांचा पुढाकार;कृतज्ञतापर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन.
चाकुर:(ता.प्रतिनिधी:सलीमभाई तांबोळी) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शहरातील खाजगी बह्यरुग्न सेवा ही बंदच आहे.मात्र चाकूर तालुक्यातील चापोली येथील खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी आपआपली बाह्यरुग्ण सेवा ही सुरूच ठेवली आहे.त्यामुळे कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीच्या युध्दातील चापोली येथील लढवय्या डॉक्टरांचा कृतज्ञतापर स्थानिक युवकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.कोरोना विषाणूच्या वाढता संसर्गामूळे सर्वच ठिकाणच्या बहुतांश खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी आपली बाह्यरुग्ण सेवा ही बंद केलेली आहे.मात्र अशा प्रतीकूल परीस्थितीतही चाकूर तालुक्यातील चापोली येथील खाजगी डॉक्टरांनी आपली बाह्यरुग्ण सेवा ही अविरतपणे सुरूच ठेवून चापोलीसह परीसरातील रुग्णांना सेवा देण्याचे कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामूळे करोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपातही निडरपणे रुग्णसेवा करणाऱ्या चापोली येथील खाजगी डॉक्टर डॉ.राजाराम कुलकर्णी,डॉ.नरेंद्र हाक्के,डॉ.विकास गुरमे,डॉ.विनायक लामदाडे,डॉ.झिय्या उल्लहक्क देशमुख अशा लढवय्या डॉक्टरांचा येथील युवक रमेश पाटील यांच्या पुढाकारातून कृतज्ञतापर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय सावंत व डॉ.श्रीनिवास हसनाळे यांनाही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव, माजी पंचायत समिति सदस्य निलेश मद्रेवार, चेअरमन बालाजी शेवाळे,गजानन होनराव उपसरपंच अनिकेत कांबळे, माजी माजी सैनिक तालुका उपाध्यक्ष मारोती होनराव, रमाकांत स्वामी, उपस्थित होते.
0 Comments