ॲड.अपर्णाताई रामतीर्थकर विचाराचं वादळ शमलं
सोलापूर:(प्रतिनिधी) येथील थोर समाजसेविका,वक्त्या महाराष्ट्रात हजारो व्याख्यांनांनी घराघरात पोहचलेल्या,प्रबोधनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या,सामाजिक बांधिलकीत आयुष्य अर्पित करून लोकांमध्ये सकारात्मक,सांस्कृतिक,कौटुंबिक बदल घडवून आणण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या,शेकडो निराधारांची आई त्याचे विचार समाजातील अनेकांना एक आशेचा किरण होता.स्पष्ट आणि ओघवती वानी,सगळ्यातला सहज वावर अनेकांना भाऊक करून जायचा मुलींनी कुंकू लावावे,रोज देवाची पूजा करावी,सासूने सूनेशी आणि नवऱ्याने बायकोशी कसे वागावे?घर संसार यातच स्त्रियांनी रमावे असे त्या सांगायच्या यावर अनेकांनी त्याना महिला विरोधी सुध्दा ठरवले मात्र परखड विचार मांडताना त्यांनी काहीच मुलाहिजा बाळगली नाही एका पत्रकाराची पत्नी असताना आयुष्यात केलेला त्यांचा संघर्ष वाखाणण्याजोगा होता.पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या त्यांची भाषणे ही एक पर्वणी होती.सतत ऐकत राहावे असे विचार त्या स्वतःच्या भाषणात मांडत असतं एक विचार आज संपला. ॲड.अपर्णाताई रामतिर्थकर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी 11:50 वाजता दुःखद निधन झाले.त्यांना "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments