Latest News

6/recent/ticker-posts

रोज २०० गरजू लोकाना अन्न (टिफिन) वाटप

रोज २०० गरजू लोकाना अन्न (टिफिन) वाटप


 



पुणे:(शहर प्रतिनिधी:तानाजी मोहोळकर) कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची मुदत ३ मे पर्यत वाढविण्यात आली आहे.लॉक डाउनच्या काळात देखील उपाशी, गरजूं नागरिकासाठी अविरत पणे रोज २०० टिफिन गरजूंना मदत म्हणून अन्न वाटप करण्यात येणार असून आज पासून सुरुवात शिव वंश प्रतिष्ठान व शिवशंभो मित्र मंडळ शेवाळेवाडी अध्यक्ष समीर पवळे, नंदिनी टकले नगर मित्र मंडळ अध्यक्ष अभय वाघमोडे व राजकुमार भंडारी यांच्या सहकार्यातून अन्नदान वाटप करण्यात येत आहे.शिव वंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन राम टकले व त्यांचे सहकारी यांच्या मार्फत फातिमानगर, हडपसर,पुलगेट, बंद गार्डन, मांजरी या भागांमध्ये भुकेले व तहानलेली गरजूंना यापुढे  मदत म्हणून रोज २०० टिफिन येथेल गरजू लोकाना अन्न (टिफिन) वाटप करणयात आले.सध्या कोरोनाने थैमान माजलेला आहे यात लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यात रोज मोलमजुरी करून आपले संसार चालवतात त्यांची या काळात अडचण निर्माण झाली आहे.त्यांना संकटाच्या काळात सहकार्यच्या भावनेने कोणीही उपाशी नसावे आपणच आपल्या बांधवांचे सरंक्षण करणे ही काळाची गरज आहे असे इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना समाजसेवक नितीन(दादा)टकले यांनी प्रतिक्रिया दिली.यावेळी राजकुमार भंडारी,समीर  पवळे,प्रवीण शेवाळे,सचिन  जाधव,राम जाधव,अनिकेत नीलाजकर,आकाश चोरमले,परवेज शेख,तबरेज शेख,सुरज कानडे आदी उपस्थित राहून परिश्रम घेत आहे.


Post a Comment

0 Comments