काळ्याबाजारात धान्य विक्री करणाऱ्या रेशन दुकानांचे परवाने निलंबित करावेत- पालकमंत्री
लातूर:(प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे एप्रिल २०२० मधील अन्नधान्य वाटपाची माहिती घेऊन प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचल्याची प्रशासनाने खात्री करावी जे रेशन दुकानदार काळ्याबाजारात अन्नधान्याची विक्री करीत आहेत, त्या दुकानदारांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत त्याप्रमाणेच शासनाने जूनअखेरपर्यंत लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्याचे दिलेल्या सूचना प्रमाणे पुरवठा विभागाने कार्यवाही करावी असेही सूचित मंगळवार २८ एप्रिल २०२० रोजी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व लॉक डाउन मधील शिथिलता अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत अमित विलासराव देशमुख
(वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिककार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर) हे बोलत होते.
0 Comments