लातूर-बाभळगांव येथे कोरोना ग्रामसुरक्षा समितीची स्थापना
लातूर:(प्रतिनिधी) कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून बाभळगाव ता.जि. लातूर येथे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत कोरोना संदर्भात एक बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये कोरोना ग्रामसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली असून, सरपंच-(अध्यक्ष), पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषीसाह्य्यक हे समिती कार्य पाहणार ही समिती पुढील प्रमाणे कार्यवाही करेल.
१)बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस कलेक्टर / तहसीलदार यांची परवानगी असल्यास गावात येण्याची परवानगी मिळेल.
२)विनापरवाना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना गावात येऊ न देणे. त्यास नागरिकांनी सहकार्य करावे.
३)बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तींसाठी आज पासुन जि.प.शाळा बाभळगाव येथील वर्ग खोल्या ताब्यात घेण्यात आल्या असुन स्त्री व पुरूष स्वतंत्र विलगिकरण करण्यात येईल.
४)बाहेरून आलेल्या व्यक्तीस १४ दिवस विलगिकरण कक्षात राहाणे बंधन कारक राहील.
५)कोरोना-१९ सदोष लक्षणे आढळल्यास तात्काळ समितीस किंवा आरोग्य विभागास कळवावे.
६)कुणीही परस्पर गावात आल्यास किंवा माहिती लपवुन ठेवल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
येथुन पुढे कुणीही गावात येणार असल्यास प्रथमतः समितीला संपर्क साधू कोरोना ग्रामसुरक्षा समितीला सहकार्य करून संभाव्य धोका टाळावयास मदत करावी असे आव्हान समितीने केले आहे.
0 Comments