Latest News

6/recent/ticker-posts

लातूर १९ उस्मानाबाद ५ बीड ७ प्रलंबित रुग्ण

लातूर १९ उस्मानाबाद ५ बीड ७ प्रलंबित रुग्ण



लातुर जिल्हयातील ८२  पैकी ६३  निगेटीव्ह, १९ प्रलंबित


उस्मानाबाद ४९ पैकी ४३ निगेटीव्ह, ५ प्रलंबित व १ Reject


बीड ५७ पैकी ५० निगेटीव्ह, ७ प्रलंबित


लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक २५.५.२०२० रोजी एकुण १८८व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  १३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ८ व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण ४२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी  ३७ व्यक्तींचे अहवाल   निगेटीव्ह आले असुन ५ व्यक्तींचे  अहवाल प्रलंबित आहेत. निलंगा येथुन १६  व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी १० व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून ६ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.रेणापूर  येथून ३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  सर्वच ३ व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत.  असे लातुर जिल्हयातील  एकुण ८२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ६३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन १९ व्यक्तींचे अहवाल  प्रलंबित आहेत.तसेच बीड जिल्हयातील ५७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ५० व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ७ व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.उस्मानाबाद जिल्हयातील ४९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ५ व्यक्तींचे अहवाल  प्रलंबित आहेत व एका व्यक्तीच्या स्वॅब परिपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे. असे एकुण आज १८८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १५६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  ३१ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत व  एक व्यक्तीचा अहवाल Reject करण्यात आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments