Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्यात सामंजस्य करार

महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्यात सामंजस्य करार

निलंगा : येथील महाराष्ट्र महाविद्यालय आणि लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) या दोन महाविद्यालयांदरम्यान सामंजस्य करार (MoU) दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाला. या वेळी महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा चे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील विद्या परिषद सदस्य डॉ. कर्मवीर कदम आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.

या प्रसंगी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे आणि महाराष्ट्र महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक व संशोधनात्मक माहितीचे आदानप्रदान, अभ्यासोत्तर व अभ्यासपूरक उपक्रम, क्रीडा प्रशिक्षण शिबिरे, संयुक्त अभ्यासमंडळाचे आयोजन, विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण आणि उद्बोधन वर्ग, तसेच मेडिकल व फिटनेस कॅम्पसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नुकतेच राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड कडून मराठवाड्यातील पहिले “एम्पावर्ड ऑटोनॉमस” महाविद्यालय म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. या उल्लेखनीय कराराबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील यांनी दोन्ही संस्थांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments