मोहोळ येथे अशिहारा कराटे इंडिया (AKI) तर्फे यशस्वी कलर बेल्ट परीक्षा
मोहोळ : दि. १४ - वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल, कुरूल रोड, मोहोळ येथे अशिहारा कराटे इंडिया (AKI) यांच्या वतीने कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या परीक्षेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशस्वीरीत्या उत्तीर्णता मिळवली. विविध कलर बेल्ट परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत आत्मसंयम, शिस्त आणि परिश्रमाचे उत्तम उदाहरण सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार भारत नाईक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अमित कुलकर्णी आणि रणधीर देशमुख उपस्थित होते. यावेळी पालक दिनेश आदलिंगे, सोमन्ना गुरव, रमेश जगताप, पवार मॅडम, केवळे मॅडम, थिटे मॅडम, गाडेकर मॅडम व मोरे मॅडम आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अशिहारा कराटे इंडियाच्या अधिकृत प्रमाणपत्रांसह बेल्ट प्रदान करण्यात आले.
या परीक्षेचे मुख्य परीक्षक म्हणून के. वाय. पटवेकर यांनी कार्यभार सांभाळला, तर महिला सहपरीक्षक म्हणून सौ. सुजाता (माळी) आदलिंगे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शनही सौ. सुजाता आदलिंगे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात पत्रकार भारत नाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता खेळाकडे आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दिशेने वाटचाल करावी. कराटे सारख्या खेळामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, शिस्त व संयम विकसित होतो.



0 Comments