Latest News

6/recent/ticker-posts

विभागीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय निलंगा ठरले अव्वल

विभागीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय निलंगा ठरले अव्वल


नांदेड : दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे विभागीय स्तरीय शालेय रस्सीखेच (Tug of War) स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथील 14 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विभागात प्रथम क्रमांक पटकावला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

संघामध्ये रुद्राक्षी बेवनाळे, येवते जानवी, जाधव जानवी, मेहेत्रे ऋतुजा, शेख हुमेरा, सोनवणे प्रांजली, घारोळे सिद्धी, मोहोळकर जागृती आणि श्वेता मलकुंदे या खेळाडूंनी सहभाग घेत उल्लेखनीय खेळ दाखवला. या संघाचे क्रीडा मार्गदर्शक सय्यद मुजीब सर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

या उत्कृष्ट यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, सचिव सरतापे, मुख्याध्यापक नटवे एम. आर., उपमुख्याध्यापक पवार डी. डी., पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस. डी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments