Latest News

6/recent/ticker-posts

जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव युवराज पाटील यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार

जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव युवराज पाटील यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार


लातूर : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यंदाच्या वर्षी प्रथमच राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांचाही या गौरवात समावेश करण्यात आला आहे. या विभागातील पहिलाच दर्पण पुरस्कार पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना जाहीर झाला असून, हा सन्मान संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

युवराज पाटील हे मूळचे चोबळी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील असून त्यांनी यापूर्वी लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेची, प्रभावी जनसंपर्ककौशल्याची आणि प्रशासकीय नेतृत्वाची दखल घेत ही राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे.

याचबरोबर, विशेष दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांना जाहीर झाला आहे. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे ६ जानेवारी रोजी हा सन्मान सोहळा पार पडणार असून त्या वेळी ही पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या विशेष सन्मानाबद्दल पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे विविध स्तरावरून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments