प्रभाग १४ मधून डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल यांचा भाजपाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल
लातूर : धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी आज आपल्या समर्थकांसह प्रभाग १४ साठी भाजपा अर्ज स्वीकृती समिती आणि भाजपा निवडणूक प्रमुख डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अनेक सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी म्हणून डॉ जुगलकिशोर यांनी आपल्या कार्याची छाप पाडली आहे. लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोशिएनचे अध्यक्ष, भाजयू मोर्चाचे उपाध्यक्ष, माझं लातूर परिवाराच्या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग तसेच मोफत पंढरपूर वारी, रस्ते सुरक्षा अभियान, धार्मिक कार्यात पुढाकार असलेले तरुण कार्यकर्ते म्हणून ओळख. त्यांच्या या कार्याची दखल घेत इंदोर येथील मां भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने सन २०२३ साली मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे.
डॉ. जुगलकिशोर यांच्या उमेदवारीने मात्र आता प्रभाग १४ मध्ये भाजपात चांगलीच चुरस वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवप्रसाद तोष्णीवाल, विजय गवळी, प्रवीण पवार, महादेव पोलदासे, प्रभुआप्पा लखादिवे, गणेश सगर, अमोल कांबळे, माधव सूर्यवंशी, मोहन गौंड, उत्तम लोंढे, झाकीर सय्यद, नरेश घंटे, ॲड. एकनाथ गजीले, दत्तराम कराड यांच्यासह प्रभागातील अनेक मान्यवर नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments