सुभेदार रामजी नगरातील युवकांचा स्तुत्य उपक्रम
नगराच्या प्रवेशद्वारावरच बसविले सॅनिटायझर मशीन
लातूर:(प्रतिनिधी) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन, राज्य सरकार यासोबतच स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. असाच एक स्तुत्य उपक्रम शहरातील सुभेदार रामजी नगर प्रभागाच्या नगरसेविका कांचन अजनीकर यांच्या पुढाकारातून आणि प्रभागातील युवकांच्या सहकार्याने राबविला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश सुरवसे तथा अमर कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सैनिटायझर मशीन बसविण्यात आली आहे. या निर्जंतुकीकरण मशीनचा लोकार्पण सोहळा आज प्रभागातील युवकांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी रत्नदीप अजनीकर, कमलाकर सुरवसे, मिलिंद श्रीमाळे, धीरज साबळे, किशोर भालेराव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.नगराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित या निर्जंतुकीकरण मशीनचा प्रभागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि कोरोनामुक्त नगर ठेवण्यास सहकार्य करावे तसेच आपले आणि आपल्या कुटुंबाचे या विषाणूपासून सरंक्षण करावे असे आवाहन यावेळी अजनीकर यांनी केले.
0 Comments